मन कि शांति के लिए चाहे आप मंदिर जाओ,चाहे आप मश्जिद जाओ,या फिर चाहे आप चर्च जाओ शांति तो हर जगह मिल जाती है फिर न जाने क्युं अन्दर जानेसे पहले जात बीच मैं आ जाती है....
Wednesday, 9 May 2018
Friday, 4 May 2018
Sunday, 29 April 2018
खिडकी
वयाची सत्तरी ओलांडली की माणुस तसा एकटा पडतो...... खर तर एकटे पणाची व्याख्या या वयामधेच समजते. . .. .सहा महिन्यांपूर्वी माझ्या पत्नीच निधन झाल कारण काय तर कैंसर तशी ती जास्ती आजारी वगैरे कधी पडायची नाही पण या वेळेचा आजार तिला आपल्या सोबत घेऊन गेला ५५ वर्षाँचा आमचा संसार ज्या वेळी मला तिची सगळ्यात जास्ती गरज होती अश्या वेळी ती मला सोडुन गेली.....माझा जन्म खेड्यामधला शिक्षण वगैरे सगळ तिथेच झाल खेड्यामधे असल्यामुळे वयाच्या १५ व्या वर्षी लग्न झाल लग्ना वेळी संगीताच वय १० वर्ष होत लहानशी ती दोघे मिळुन आम्ही शाळेला जायचो अस करत आम्ही शिक्षण पुर्ण केल...... मुंबई महानगरपालिका मधे आम्हा दोघांना लिपीक म्हणुन नोकरी मिळाली आणि गाव सोडुन आमची जोड़ी मुंबईला आली मुंबई म्हणजे फक्त धावपळ हे इथे आल्या नंतर समजल नारायण चालीमधल्या २ खोलीमधे आम्ही आमचा संसार मांडला......मुंबई ची चाल म्हणजे दुसर प्रेमाच संकुल कारण इथे सगळे गुण्यागोविंदने नांदतात त्या मुळे मुंबई मधे कधी एकट वाटल नाही २ वर्षानी अमित चा जन्म झाला संगिताची इच्छा होती एकच मुलगा बस त्या मुळे आम्ही कधी दुसर्या मुलाचा विचार नाही केला ...... एकुलता एक असल्या मुले अमित चा लाड खुप झाला अभ्यासात सुद्धा तो खुप हुशार होता १० मधे तो शाळेत पहिला आला पुन्हा १२ वी मधे सुधा तो चांगल्या गुणानि पास झाला त्याला इंजिनियर बनायच होत आणि ते त्याने स्वतः अभ्यास करुण मिळवल मुंबई च्या मोठ्या कॉलेज मधे त्याने एडमिशन मिळवल पुढे इंजीनियरिंग सुधा त्याने फर्स्ट क्लास मधे पास करुण दाखवल त्याच्या कष्टाच फल त्याला मिळाल फॉरेन च्या एका मोठ्या कंपनी मधे त्याला नोकरी
मिळाला आई च प्रेम त्याला जायची परवानगी देत नव्हती पण मीच समजावून सांगुन त्याला जाऊ दिल...... आता वाटत तेव्हा माझ चुकल....तो गेला तस आम्हाला विसरला तसा तो यायचा वर्षातुन एकदा पण २ -४ वर्ष्यानी तेसुद्धा कमी होत गेल कामाच कारण सांगुन तसा तो आधी पासुनच फ़ोन कमी करायचा नंतर ते कमी हळुहळु बंदच झाल...... अचानक तो एक दिवस एका मुलीला घेऊन आला खरतर त्याने लग्न केल हे सांगायची अपोचारिकता त्याला पुर्ण करायची होती ते पुर्ण करुण जोड़ी एका फाइव स्टार हॉटेल मधे रहायला गेली कारण चालीमधल ते घर आता त्याच्यासाठी कमीपणाच झेल होत......दुसऱ्यादिवशी जोडी फोरैंला कधी निघुन गेली काही समजलच नाही इथे त्याची आई वाट पाहतच राहिली हा पण प्रत्येक महिन्याला आम्हा म्हातारा -म्हतारीला पैसे पाठवायच तो कधी विसरत न्हवता पण त्या वेड्याला कुठ माहिती होत ही खंगलेली जोड़ी आता पैशांची नाही तर प्रेमाची भुकेलि आहे .......पुढे पुन्हा तो अचानक एक दिवस आला त्याने मुंबई मधे फ्लॅट घेतला होता चांगला दिढ़ करोड़ चा त्या घरात आम्ही रहाव तो आमच्यासाठीच घेतला आहे अस खुप काही बोला तो त्याची आई त्याच्या या बोलण्याला भाळली पण त्याला त्या घराची राखण करण्यासाठि कोणाचीतरी गरज होती म्हणुन त्याला आमची आठवण आली हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत........ मला जायच न्हवत पण त्याच्या आई मुळे आम्ही चाल सोडुन त्या पॉश घरात रहायला गेलो..... ते घर म्हणजे एक पिंजराच होत चालीमधे आम्ही शेजारी म्हणजे एक कुटुंब होतो पण इथे शेजारी अस कोणी नव्ह्त सगळ एकट करायच आणि एकट रहायच हा नियम आमच्यासारख्या चालीत राहिलेल्या लोकाना हा नियम तसा खुप अवघड होता पण शेवटी नियम तो नियम......त्या पिंजऱ्यात आम्ही म्हातारा-म्हातारी जगत होतो.....पण कैंसर मुळे संगीता मला सोडुन गेली रोज़ जेवताना माझी वाट बघणारी आज जेवताना माझ्यासोबत न्हवती.....आई नाही राहिली हे माहिती असुन सुद्धा आमचा मुलगा कामाच कारण सांगुन आला नाही हा पण अंतिमसंस्कार साठी पैसे पाठवुन त्याने त्याच कर्त्यव केल.....आता हे घर मला एकट्याला खायला उठल होत दिवसात २४ तास असतात हे आता मोजता येत होत.....
सकाळी उठून अवरून खिड़की मधे बसुन रहण आता नित्य नियमाच झाल होत बसायच कारण फक्त इतकच की त्या खिड़की बाहेरच्या दृश्यशिवाय आता आयुष्यात काही राहिल न्हवत पण आजचा दिवस थोडा वेगळा होता माझ्या घरच्या खिडकीतुन पलिकडच्या कंपाउंड मधली बिल्डिंग दिसायची आज पर्यंत त्या बिल्डिंग कड़े कधी लक्ष गेल न्हवत पण त्या बिल्डिंग मधल्या माझ्या खिडकीच्या बरोबर समोरच्या खिड़की मधल्या एका सुंदर हसण्याने माझ लक्ष वेधुन घेतल........गोड निरागस चेहरा टपोरे डोळे छोटे केस अंदाज़े ९-१० वर्षांची असेल त्या दिवशी पहिल्यांदा ती माझ्याकड़े बघुन हसली होती खुप दिवसांनी माझ्या चेहऱ्यावर हासु आल होत .....हसुन ती निघुन गेली कदाचित त्या फ्लॅट मधे ते नवीन राहयला आले होते कारण या आधी कधी ती खिडकी उघडी नव्हती.....का कुणास ठाऊक दिवसभरात खुप वेळा मी त्या खिडकीकडे बघितल फक्त ते गोड हसन पाहण्यासाठी पण दिवसभर ती खिडकी बंदच होती रात्री त्या खिडकीकडे नजर होती खुप वेळ तिची वाट बघितली पण ती नाही आली तिची वाट बघुन मी झोपुन गेलो......
सकाळी जाग आली तसा खिडकी जवळ गेलो सगळ शांत वाटत होत थोडा वेळ वाट बघुन आता उठणार इतक्यात ती गोड मुलगी खिडकी मधे दिसली मला वाटत ती शाळेला जाणार होती कारण ती शाळेच्या कपड्यात होती खिडकी मधे आली तशी तीने माझ्याकडे पाहिल तीचा तो निरागस चेहरा पाहुन खुप दिवसांनी सकाळी अगदी प्रसन्न वाटत होत माझ्याकडे बघुन ति हसली तिच्या गालावरची कलि जणू फुलाच्या कलिसारखी भासत होती मला टाटा करुण ती निघुन गेली आज खुप छान वाटत होत पुन्हा जगावस अस वाटत होत ती खिड़की आता सोडवत नव्हती दुपार झाली तरी नजर फ़क्त त्या खिड़कीकड़े होती आता त्या खोलीमधे हालचाल जाणवत होती आणि तो गोड चेहरा पुन्हा नजरेस आला शाळेचा पहिला दिवस होता वाटत थकलेली दिसत होती पण चेहऱ्यावर हसू मात्र तेच अगदी सकाळसारख हसून ती गेली आज अर्धी चपाती जास्ती खाली पोट भरल्यासारख वाटत होत ........
आता हे सगळ रोजच झाल होत पहिल्यांदा रोजची गोष्ट खुप छान वाटत होती सकाळ,दुपार ,संध्याकाळ तिच्या गोड हसण्याने आता आपलस वाटत होत रात्र रात्र भर जागणारा मी पण तिच्या मुळे आता छान पने झोपत होतो एका सकाळी तर तिने मला खुप छान भेट दिली नेहमीसारखी मी खिडकीमधे तिची वाट बघत होतो रविवार होता ती उशीरा उठणार अस वाटल होत पण सकाळी सकाळी उठून ती खिडकीमधे हजर झाली तिच्या हाथामधे मोठा कागद होता त्याच्या मधे काय होत तें माहिती नव्हत तिने माझ्याकडे बघून एकदा गोड हसली अन तिने तो कागद उघडून मला दाखवला त्याच्यामधे गुड मॉर्निंग आजोबा अस लिहिल होत क्षणभर मला काय बोलाव काही समजलच नाही डोळ्यांमधून अलगद पानी आल खुप दिवसांनी हे आनंद अश्रु होते आमच्यामधे काही नात नसताना सुद्धा ती माझी नात झाली होती आज एका गोड नातीचा आजोबा बनुन मि खुप आनंदी होतो ........
तिला भेटण तस मला काही अवघड नव्हत पण त्या खिडकीमधे बसून तिला बघन खुप छान वाटायच त्यामुळे मी तिला कधी समोरासमोर भेटलो नव्हतो आता खुप दिवस झाले होते ती कधी चुकत नव्हती पण आज सकाळी ती खिडकीमधे आलीच नाही मी खुप वेळ तीची वाट बघितली पण ती नाही आली कदाचित शाळेला उशीर झाला म्हणून नसेल आली अशी मनाची समजुत खूपदा घातली पण का कुणास ठाऊक आज मन बैचेन वाटत होत कश्यामधेच लक्ष लागत नव्हत दुपारी खुप वाट बघितली पण ती नाहीच आली रात्री उशिरा त्या बिल्डिंग मधे पोलिसगाडी वगैरे दिसत होती पण काही कळत नव्हत पुढचे दोन दिवस ती खिड़की बंदच होती काहीच कळत नव्हत काय कराव आता तिच्या घरी जाऊन बघाव अस ठरवल होत इतक्यात ती खिड़की उघडली अन ती दिसली आता कुठे जिवातजीव आल्यासारख वाटत होत पण आज तिच्या चेहऱ्यावर हसु नव्हत तिचा चेहरा सुजला होता काळा -निळा दिसत होता रात्री पोलिस सकाळी तिचा चेहरा असा आता मात्र मला घाम सुटला होता मनात नको नको ते विचार यायला लागले मि तिच्याकडे बघून हसलो सुधा पण तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही जीव घाबरा पडला होता ........
ती खिडकीमधून उठून गेली मला काय कराव काहीच सुचत नव्हत मनात अचानक आल मागच्या एक दोन दिवसाच्या पेपर मधल्या बातम्या वाचव्या का कुणास ठाऊक पण मी पेपर सोधत होतो ख्रर तर दोन दिवस मी पेपर वाचलाच नव्हता पेपर हातात घेतला मनात एक प्रकारची भीति होती कसली कळत नव्हती पण होती पेपर उघडला तसा पहिल्याच पानावर माझ्या नातीचा फोटो होतो काळजात एकदम धस्सस्स झाल डोक सांगत होत ती बातमी नको वाचु पण मनाने ते नाही ऐकल हेडलाइन होती ९ वर्षीय मुलीवर शाळेच्याच बस चालकाने केला बलात्कार शेवटचा शब्द वाचुन डोक सुन्न झाल काय कराव काही सुचल नाही पुढे मी बातमी वाचलीच नाही उठून मी खिड़की जवळ गेलो पण माझी नात तीथे नव्हती माझ्या डोळ्यातील पानी थाम्बतच नव्हत आज पहिल्यांदा डोळ्यासमोर तिचा गोड चेहरा नाही तर सुजलेला काळा -निळा चेहरा दिसत होता मला काहीच सूचत नव्हत मी काहीच करू शकत नाही या मुळे तर आणखी दुखः वाटत होत ......
रोज पेपर मधे काहिना काही येत होत पण ते सगळ वाचायची हिम्मत काही माझ्यामधे नव्हती ती रोज खिड़की मधे बसायची पण आता चेहऱ्यावर हसु नाही तर डोळ्यात अश्रु घेऊन आता तिच्याकडे बघन होत नव्हत अन तिला जाउन भेटणार इतका धीट मी नव्हतो दुसऱ्या दिवशी मी उठून खिडकीमधे गेलो काय बघायला मिळणार हे माहिती होत पण माझ्या डोळ्यांनी जे बघितल या मुळे पायाखालची जमीन सरकली
तिने स्वताःला गळफास लाउन घेतला होता तीचा चेहरा मला दीसत होता तिच्यासोबत मला माझा जिव गेल्यासारख वाटत आज मी पुर्णपणे सुन्न झालो होतो रडू येत होत पण डोळ्यांमधे पाणी नव्हत मी तिथुन उठून गप्प बिछ्याण्यावर पडून राहिलो आता मात्र डोळ्यातील पाणी थांबत नव्हत जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती मी आधी खिड़कीजवळ गेली खिड़की बंद झाली होती मला तर वाटल कायमची .........
त्या दिवसापासून जीव नकोसा झाला होता जेवण गोड लागत नव्हत झोप तर खुप लाम्बची गोष्ट होती काय चुकी होती त्या निरागस मुलीची कुठल्या पापाची इतकी मोठी शिक्षा तिला मिळाली गळफास म्हणजे काय हे सुद्धा तिला कळत नसेल पण तो मार्ग तिने निवडला याच खुप मोठ दुःख वाटत होत पण आपण दुःख करण्याशिवाय दूसरर काय करू शकतो आता खिड़की खायला उठत होती मी का त्या खिडकीमधे जाऊन तिला बघितल अस वाटत होत घराबाहेर जास्ती न पडणारा आज बाहेर पडलो मनाची खिड़की त्या विचारातून बंद करुण टाकावी अस वाटत होत पण त्या साठी आधी तिची खिड़की बंद करण महत्वाच होत त्या मुळे पहिल्यांदा मी तिच्या घरी गेलो तिचे आई वडील मला ओळखत नव्हते त्यांच्या चेहर्यावरच दुःख साफ़ दिसत होत पण ७० वर्षाचा म्हातारा हातात विट वाळु घेऊन आपल्या दारात उभा आहे हे बघून ते थोड़े चकितही होती मी त्यांना त्यांच्या मुलीची खोली कोणती विचारल त्यांनी मला सांगितल सुद्धा पण अजूनही ते मला बघून खुप गोंधळात होत हा म्हातारा कोण हाच प्रश्न त्यांना पड़ला असेल मी तिच्या खोलीत गेलो तस माझ्या डोळ्यांतुन अश्रु वाहत होते मी काहीच न बोलता ती खिड़की मला जमेल तितक वाळू अन विटानी मूजवून टाकली हे सगळ ते दोघे बघत होते कुठे तरी त्यांना समजल होत वाटत म्हणुन त्यांनी मला नाही अडवल पण सगळ झाल्यावर तिच्या आईने मला विचारल बाबा तुम्ही अस का ??
माझ्या मनात असलेल त्या खिडकीच दुःख मी त्या दोघांना सांगितल कदाचित मि तिची पुन्हा आठवण काढून मी दुःख वाढवल पण त्या दिवशी मी त्या घरची न माझ्या मनाची खिड़की कायमची बंद करुण टाकली .........
लेखक
श्रीहर्ष कांबळे
Subscribe to:
Posts (Atom)